शहापूर तालुक्यातील लाडक्या बहिणींनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट….
तालुक्याचे आमदार दौलत दरोडा यांना मंत्री पद देण्यासाठी अजितदादा यांना दिले निवेदन…
मुंबई : प्रफुल्ल शेवाळे
मुंबई : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक 2024 मध्ये संपूर्ण राज्यात महायुतीला भरघोस यश मिळालं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस चे तब्ब्ल 41 आमदार निवडून आले आहेत. याच धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांचे अभिनंदन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील लाडक्या बहिणींनी थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मुंबई मधील शासकीय निवास स्थान देवगिरी येथे धाव घेतली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण च्या अध्यक्षा सौ. कल्पना तारमळे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली तालुक्यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यां महिला उपस्थित होत्या.
समस्त लाडक्या बहिणींनी अजितदादा पवार यांच्या सोबत फोटो काढले आणि तालुक्यातील नवनिर्वाचित आमदार दौलत दरोडा यांना मंत्रीमंडळामध्ये सामील करून घेण्यासाठी निवेदन दिलं आहे. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,महाराष्ट्र प्रदेश कोकण विभागीय उपाध्यक्ष मायाताई कटारीया,राज्य महिला आयोग अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांच्या भेटीचा योग सुद्धा उपस्थित लाडक्या बहिणींना मिळाला आहे. संपूर्ण राज्यात लाडक्या बहिणींनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि महायुतीला भरघोस मतांचा आशीर्वाद देऊ केला आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा सौ. कल्पना तारमळे यांनी व्यक्त केलं आहे.