टिटवाळा येथील नामांकित रिजन्सी गृह संकुलामध्ये भटक्या कुत्र्यांचा महिलेवर जीवघेणा हल्ला….महिला गंभीर जखमी…

टिटवाळा येथील नामांकित रिजन्सी गृह संकुलामध्ये भटक्या कुत्र्यांचा महिलेवर जीवघेणा हल्ला….महिला गंभीर जखमी…

टिटवाळा (कल्याण ) : प्रफुल्ल शेवाळे

रिजन्सी गृह संकुल परिसरातील इमारत क्र. ८ आणि ९ च्या परिसरात काल रात्रीच्या (दि.६ डिसेंबर )सुमारास भटक्या कुत्र्यांनी एका महिलेवर जीवघेणा हल्ला केला आहे.. ३/४ कुत्र्यांनी सदर महिलेवर केलेल्या या हल्ल्या मध्ये महिला ही गंभीर जखमी झाली आहे. तीला पुढील उपचारासाठी गोवेली येथे प्राथमिक उपचार केंद्रामध्ये दाखल केले आहे. सदर महिलेची ओळख पटलेली नाही. परिणामी सदर च्या घटनेने रिजन्सी गृह संकुल परिसरातील समस्त नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेकडून श्वान पथक सदर घटना स्थळी पोहचले. परंतु त्यांना केवळ १/२ कुत्रे पकड्ण्यात यश आले आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांकडून संतप्त आणि संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. रिजन्सी गृह संकुल फेडरेशन चे अध्यक्ष दिपक कांबळे यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की परिसरात भटक्या कुत्र्यांना जे लोक खायला देतात त्यामुळे भटके कुत्र्यांची संख्या वाढत आहे… अशा घटनाना हे लोक तितकेच जबाबदार आहेत. तसेच आम्ही सदोदित पणे महापालिकेच्या श्वान पथका च्या सान्निध्यात आहोत.. परिसरात शक्य ते कुत्रे पकडून, त्यांना शक्य त्या लसी देऊन इतर लांब ठिकाणी पुन्हा सोडून द्यावे अशी आमची मागणी असल्याचे म्हटलं आहे.तसेच संकुला मधील नागरिकांनी आपल्या लहान मुलांना एकट्याला खेळण्यासाठी सोडून देऊ नये, लहान मुलांसोबत जातीने हजर राहून अशा घटनांना काही प्रमाणात का होईना आळा घालण्यासाठी सहकार्य केले पाहिजे.

रिजन्सी गृह संकुला मधील निवडक सदस्यांच्या प्रतिक्रिया…

रिजन्सी वासियांना होणारा कुत्र्यांचा त्रास हा खूप वेळा आपण अनुभवलेला आहे. आणि त्यावर उपाय करण्याचा देखील प्रयत्न झाले, पण आज झालेल्या घटनेवरून ते अपुरे पडत आहेत असं वाटत आहे.

हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे…असा दुर्दैवी प्रसंग भविष्यात आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर देखील ओढावू शकतो.

फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की, कृपया आपण याची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित नविन सिक्युरिटी ची वियुक्ती करावी व सर्व रिजन्सी वासियांना सुरक्षीत करावं.🙏
— कैलास जाधव

रिजन्सी गृह संकुला मधील अतिशय भयावह घटना आहे.

यापूर्वी ही बऱ्याच लोकांना, मुलांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा घटना घडल्यात. पण ही घटना क्रूर हल्ला असल्याची आहे.

प्राणी सरंक्षण कायदा विचारात घेऊन या बाबत ठोस काही उपाययोजना होणे अतिशय आवश्यक झाले आहे.
भविष्यात अशा घटना घडू नये याची खबदारी घेणे खूप गरजेचे आहे.
काही लोक भटक्या कुत्र्यांना अन्न देतात, ज्यामुळे त्यांचा वावर सोसायटीत वाढतो. याबाबतीत ही विचार व्हावा.
–ऍड. शेखर वाकोडे ( रिजन्सी गृह संकुल फेडरेशन सदस्य )

भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणारे हे स्ट्रीट डॉग प्रेमी काहीही बोलणार नाहीत. यावेळेपुरतं अंडरग्राउंड !

खरं तर ज्यांनी बिल्डिंगच्या आजूबाजूला कुत्रे पाळून ठेवली आहेत, अश्या लोकांनाच ह्या घटनेचा जबाबदार म्हणून गृहीत समजले पाहिजे.

जिवंत माणसाची हत्या करून व कुत्र्यांची सेवा करणाऱ्या लोकांनी थोडा विचार करावा. — दिपक तोरणे

खूपच भयानक घटना घडली आहे कॉम्प्लेक्स मधे, उद्या त्या ठिकाणी आपण किंवा आपली फॅमिली असू.
सरसकट बंदोबस्त करावा लागेल या कुत्र्यांचा.

यावर सर्वानुमते निर्णय घेतले जातील स्पेशल AGM -फेडरेशन च्या मिटिंग मधे .

काही मोठे निर्णय घ्यावे लागतील कॉम्प्लेक्स च्या हितासाठी…- निलेश देसाई

सदर घटनेचे गांभीर्य केवळ ठराविक इमारती करता न लक्षात घेता पूर्ण रिजन्सी गृह संकुल परिसरात, आणि कोणत्याही प्रकारची राजकीय भूमिका न घेता सर्वांच्या हितासाठी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा तत्सम काही उपाय योजना करण्यासाठी समस्त नागरिकांनी पुढे सरसावले पाहिजे… – विनोद इंगळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!