शहापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दौलत दरोडा यांना राज्य मंत्री मंडळामध्ये समाविष्ट करण्याबाबत ठराव…
विधानसभा निवडणुकीमध्ये झालेला विजय हा माझा विजय नसून फक्त आणि फक्त माझ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे…- आमदार दौलत दरोडा, शहापूर
शहापूर : प्रफुल्ल शेवाळे
शहापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शहापूर यांच्या वतीने तालुक्यातील आदिवली गावात राष्ट्रवादी चे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची विशेष बैठक पार पडली. दौलत दरोडा यांनी विधानसभे मध्ये बाजी मारली असून ते पाचव्यानंदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. निवडून आल्यानंतर आमदार दरोडा आणि राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्त पदाधिकारी यांची विशेष बैठक टाकी पठार – आदिवली या गावात आयोजिली होती.
या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे यांनी आमदार दरोडा यांना महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळामध्ये समाविष्ट करण्याबाबत एक ठराव पास केला. या ठरावाला पक्षाचे चिटणीस डी. के. विशे सर यांनी अनुमोदन दिले आणि बैठकीला आलेल्या शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी दोन्ही हात उंचावून आपले समर्थन दर्शविले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शहापूर तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे यांनी म्हटलं आहे की आमदार दौलत दरोडा यांना विजय मिळवून देणे हे आमच्या साठी खूप अवघड होते, कारण प्रचाराला वेळ अतिशय कमी होता, परंतु आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी अपार मेहनत घेऊन आमदारकी ची विजयश्री खेचून आणली आहे.. आणि दरोडा साहेबांनी गेल्या पाच ते सहा महिन्यात अनेक विकास कामे पार पाडली, याच्या जोराव दौलत दरोडा यांना पाचव्यांदा आमदार म्हणून विधानसभे मध्ये तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा शहापूर च्या जनतेने त्यांना पाठवले आहे.या वेळी डॉ. सासे यांनी आमदार दौलत दरोडा यांना मंत्री पदाची माळ मिळावी म्हणून ठराव पास केला आणि उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी दोन्ही हात उंचावून आपले समर्थन या बैठकीमध्ये दर्शविले आहे.
आमदार दौलत दरोडा यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे की, मीं निवडणुकीमध्ये जिकूंन आलोय,मला या विधानसभे मध्ये आपण तमाम शहापूर च्या जनतेने आशीर्वाद दिला आहे.. आणि यामुळे मला पुन्हा एकदा आमदारकी मिळाली आहे.. परंतु हा विजय माझा एकट्याचा विजय नसून माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा विजय आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शहापूर मध्ये प्रचार सभा घेतली… अजितदादा यांचा पायगुण तितकाचा महत्तवाचा असल्याचे आमदार दरोडा यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे आणि तालुका अध्यक्ष डॉ. सासे यांनी त्यांच्या परीने अतिशय बिनचूक मोलाची कामगिरी या निवडणुकीमध्ये पार पाडली आहे. मला खेड्या पाड्यातून अनेक लोकांचा पाठींबा मिळत होता, प्रेम मिळत होते,त्याच्या जोरावर आपण या निवडणूक लढाई मध्ये जिंकून येऊ असा आत्मविश्वास वाटत होता असं आमदार दरोडा यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी म्हटलं आहे की आपण शहापूर च्या जनतेने दरोडा यांना निवडून देऊन अजितदादा यांचे हात बळकट केले आहेत. आपण सगळ्यांनी संयम राखून या निवडणुकीमध्ये आपलं काम चोख बजावले आहे.. भविष्यात आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणखीन मजबूत झाली पाहिजे.. ज्या कुणाला पक्षाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतील त्यांनी आपलं नावं आणि इच्छुक जबाबदारी आमच्या कडे पाठवून दयावी, आम्ही त्यावर विचार करू आणि त्या प्रमाणे जबाबदारी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना वाटून देऊ. राज्य मंत्री मंडळात अजितदादा पवार यांना अर्थ खाते मिळू शकते, या जोरावर शहापूर तालुक्यात विविध प्रकल्प राबविले जाऊ शकतील आणि तालुक्याचा विकास कामांसाठी अजितदादा यांच्या माध्यमातून भरघोस निधी या तालूक्याला मिळाल्या शिवाय राहणार नाही. महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळा मध्ये आमदार दौलत दरोडा यांना मंत्री पदी नेमणूक करण्यासाठी आपण सर्वजण या माध्यमातून अजितदादा यांना विनंती करीत आहोत.
यावेळी जिल्हा परिषद सोगाव गटामधून अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी, स्थानिक नागरिक यांच्या कडून आमदार दौलत दरोडा यांचा सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी आमदार दौलत दरोडा यांनी श्री क्षेत्राला टाकी पठार येथे जाऊन रिद्धी नाथ बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि फुलनाथ बाबा यांचे आशीर्वाद घेतले.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे, शहापूर तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे, प्रदेश चिटणीस डी. के. विशे सर, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रतिक हिंदुराव महिला तालुका अध्यक्ष सविता मोरगे, राष्ट्रवादी चे विविध फ्रंट सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण प्रवक्ते मुकेश दामोदरे सर यांनी केले.