महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र लढू या, समृद्ध महाराष्ट्र घडवू या….- उपमुख्यमंत्री अजित पवार..
मुंबई : प्रफुल्ल शेवाळे
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्ली येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदे मध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूकी ची घोषणा केली आहे..याच पार्शवभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेल वरून… समृद्ध महाराष्ट्रासाठी एकत्र येऊन लढण्याचे सुतोवाच केले आहे…
काय म्हणतात अजित पवार?
मागच्या दोन वर्षांचे आमचे कामं महाराष्ट्राच्या जनतेसमोर ऐतिहासिक अर्थसंकल्प, विकासाची नवी उंची, लाडकी बहीण योजना, तीन मोफत गॅस सिलिंडर आणि शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी या आणि अश्या अनेक लोकोपयोगी योजनांच्या आणि निर्णयांच्या माध्यमातून उभे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येक सहकाऱ्याने या योजना प्रत्येक घरोघरी पोहोचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.
आता निर्णायक क्षण आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, मौलाना आझाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समाजातील प्रत्येक घटकाच्या उत्थानासाठी कटिबद्ध आहे. आपण पुढे येऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र लढूया आणि समृद्ध महाराष्ट्र घडवूया.
जय महाराष्ट्र!