उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून पंकज भुजबळ आणि ईद्रीस नायकवाडी विधानपरिषदेवर…
मुंबई : प्रफुल्ल शेवाळे
मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोग आज महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक बद्दल दुपारी ४ च्या सुमारास घोषणा करणार आहे..या अगोदर महायुती सरकारने आपल्या सात कार्यकर्त्यांना विधानपरिषद आमदारकी बहाल केली आहे. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांपैकी 7 सदस्यांनी आमदारकी ची शपथ घेतली आहे..
यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी मधून पंकज भुजबळ आणि ईद्रीस नायकवाडी यांना आमदारकी देण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल मा.श्री. सी.पी. राधाकृष्णन जी यांनी माजी आमदार श्री. पंकज भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. इद्रिस नायकवडी यांची विधान परिषदेवर नियुक्ती केल्याबद्दल दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सर्वसामान्यांचे मुद्दे, प्रश्न व समस्यांना घेऊन ते विधान परिषदेत आवाज उठवतील आणि जनसेवेत सदैव तत्पर राहतील, असा विश्वास मी व्यक्त करतो. तुम्हाला पुढील राजकीय कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या या नवनियुक्त आमदारांना शुभेच्छा दिल्या आहेत.