महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची कमान पुन्हा एकदा रूपाली चाकणकर यांच्याकडे…

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची कमान पुन्हा एकदा रूपाली चाकणकर यांच्याकडे

3 वर्षांचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच गॅजेट प्रसिद्ध

मुंबई :- प्रफुल्ल शेवाळे

महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो. सध्या या आयोगाची जबाबदारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली चाकणकर यांच्यावर आहे. येत्या 22 तारखेला चाकणकर यांचा कार्यकाळ संपणार होता. मात्र, पूर्वीच आयोगाच्या अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा त्यांच्याकडेच सोपवण्यात आली आहे. या संदर्भात नुकतेच गॅजेट प्रसिद्ध करण्यात आले आहे.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच महायुतीच्या वतीने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांपैकी सात आमदारांचा शपथविधी काल पार पडला. त्यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना देखील विधान परिषदेची आमदारकी मिळणार? अशी चर्चा होती. मात्र, त्यांच्या नावाला पक्षातीलच महिला नेत्यांनी विरोध केला होता. त्यामुळे ऐनवेळी त्यांचे नाव या यादीतून वगळण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र, आता त्यांना पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता हे पद पुढील तीन वर्षे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहणार आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील 1993 मध्ये महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच समाजातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी, महिला हक्कांसाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील 1993 मध्ये या महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. महिलांवर होणारे अत्याचाराला आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच समाजातील महिलांची स्थिती सुधारण्यासाठी महिला हक्कांसाठी हा आयोग काम करतो. त्यामुळे या आयोगाला अनेक अधिकार देखील देण्यात आले आहेत. राज्यातील राजकारणाच्या दृष्टिकोनातून हे पद तेवढेच महत्त्वाचे देखील मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!