दि.२० ऑक्टोबर रोजी मुंबई मध्य रेल्वेचा महा मेगा ब्लॉक… आणि रेल्वे प्रवाशांचे महा मेगा हाल…कसारा लोकल तब्ब्ल २२ तास बंद
कल्याण : प्रफुल्ल शेवाळे
दि.२० ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वे च्या कल्याण कसारा मार्गांवर आसनगाव स्थानक ते कसारा स्थानक दरम्यान महा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे..
कसारा स्थानकात रिमॉडेलिंग करण्यासाठी सदर ब्लॉक असणार आहे.. तब्ब्ल 22 तासाच्या या ब्लॉक मध्ये रेल्वे प्रवाशांना, रविवारी कामावर जाणारे चाकरमानी यांना मात्र मेगा हाल सोसावे लागणार आहेत यात शंका नाहीच.. सदर ब्लॉक दरम्यान आसनगाव ते कसारा दरम्यान कोणतीही पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे याबद्दल कोणतीही माहिती रेल्वे रेल्वे कडून सादर करण्यात आली नाही..
पहा कसा असेल मेगा ब्लॉक..
कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन या प्रवासी संघटनेने या ब्लॉक बद्दल माहिती सादर केली आहे..
रविवार दिनांक २०/१०/२०२४ रोजी मध्य रेल्वे कसारा मार्गावर मेगाब्लॉक घेत आहे, सदर ब्लॉक हा सुमारे २२ तासांचा असेल.
उद्या रविवारी आसनगाव – कसारा दरम्यान अप डाऊन एकही लोकल धावणार नाही.
आसनगाव स्थानकात पहाटे रद्द लोकल पुढीप्रमाणे: (N-कसारा लोकल )
पहाटे
N 2 – 4:28
N 4 -5:37
N 10 -7:59
१) याव्यतिरिक्त सर्व लोकल आसनगाव स्थानकातून नियोजित वेळेत सुटणार आहेत.
२) कसारा जाणाऱ्या सर्व लोकल आसनगाव स्थानकापर्यंत येतील आणि त्या आसनगाव स्थानकातून CSMT कडे वेळापत्रकानुसार रवाना होतील.
३) हा ब्लॉक सोमवारी पहाटे २:०० वाजेच्या आत संपणार आहे.
४) सोमवारच्या वेळापत्रकाबाबत सर्व अपडेट्स वेळोवेळी कळविण्यात येतील.
तरी कृपया उद्या यानुसार रेल्वे प्रवाशांनी आणि इतर क्षेत्रातील कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपले नियोजन करावे, असं आवाहन सदर प्रवासी संघटनेने केले आहे..
सदर ब्लॉक बद्दल प्रवासी संघटना पदाधिकाऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया…
मध्य रेल्वेने ब्लॉक घेण्यापूर्वी सदर कळातील प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करून देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळा सोबत (शहापूर बस स्थानक )समन्व्य साधून आसनगाव ते कसारा बसेस ची सोय करायला पाहिजे. परंतु असं कोणत्याही प्रकारचं चित्र दिसून येत नाही…शैलेश राऊत – अध्यक्ष कल्याण कसारा रेल्वे पॅसेंजर असोसिएशन.
शहापूर बस स्थानकाला त्यांच्या नियमित बसेस चालवणे जिकरीचे झालंय ते अधिक सुविधा कशा काय पुरवतील, अशा प्रकारच्या अडीअडचणी साठी तालुका स्थानिक लोकप्रतिनिधी कधीच कामी येत नाहीत ही मुख्य शोकांतिका आहे..
जितेंद्र विशे- सरचिटणीस, उपनगरीय एकता रेल्वे महासंघ
नाशिक हुन कसारा स्थानकात येणारा प्रवासी वर्गाला शहापूर बस डेपो च्या बसेस या नाशिक हुन कसारा स्थानाक जवळ, कसारा परिसरातील प्रवाशांना येऊन डायरेक्ट कल्याण स्थानकामध्ये घेऊन जाणार आहेत.. सदर पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी शहापूर बस डेपो यांना केली असल्याची माहिती दिली आहे. तर या ब्लॉक ला प्रवाशांनी सहकार्य करावे आणि अतिशय गरजेचं असल्यास रेल्वे प्रवास हा आसनगाव स्थानकामधून करावा असं आवाहन केलं आहे.