महायुतीचा मुख्यमंत्री विराजमान होण्यासाठी दौलत दरोडा यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून आणावेच लागेल – मा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील…
शहापूर मधून श्री क्षेत्र शेलवली येथील खंडोबा देवस्थान येथे दौलत दरोडा यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ वाहिला गेला…
शहापूर (दि.६ नोव्हेंबर ) – प्रफुल्ल शेवाळे
विधानसभा निवडणूक २०२४ ची रणधुमाळी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पाहायला मिळत आहे.. महाराष्ट्राच्या विविध मतदार संघात तिरंगी, चौरगी लढती पाहायला मिळणार आहेत. यातच ठाणे जिल्ह्यातील शहापूर अ. ज. राखीव मतदार संघामधून विद्यमान आमदार दौलत दरोडा हे पुन्हा एकदा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरोडा हे आतापर्यंत सहा वेळेस विधानसभा निवडणूक लढले असून दोन वेळेस त्यांना अपयश पाहावं लागलं आहे. यंदा सातव्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी दरोडा यांनी आज शहापूर मधील शेलवली येथील खंडोबा देवस्थान येथे आपल्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ वाहिला आहे, आणि आपल्या निवडणूक प्रचाराला आजपासून सुरुवात झाली आहे.
महायुती च्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून दरोडा हे घडयाळ चिन्हवर निवडणूक लढवणार आहेत.
शेलवली येथील खंडोबा मंदिरात मा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील उपस्थित होते. यावेळेस कपिल पाटील म्हणाले की महायुती च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने कोणत्याही प्रकारच्या खोट्या अप प्रचाराला बळी पडू नका. माझ्या भाजप च्या कार्यकर्ताकडून निवडणूक प्रचारात काही वेगळीच भूमिका पार पाडायची असं चित्र दिसल्यास मला तात्काळ फोन करा.. कपिल पाटील म्हणाले की,यावेळी मला भाजप च्या वरिष्ठ नेतेमंडळी कडून सक्त सूचना आहेत की राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणायचं आहे, त्यासाठी महायुती चा प्रत्येक उमेदवार हा निवडणूक जिकूंन आमदार म्हणून विधानसभेत गेला पाहिजे.आणि अशा परिस्थिती मध्ये आपण महायुती च्या सगळ्यां कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी दौलत दरोडा यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून निवडून देणे गरजेचे आहे.
या कार्यक्रम करिता राष्ट्रवादी चे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी म्हटले आहे की आम्ही कधीच जाती पातीचे राजकारण केले नाही आणि करणार नाही. आमचा आजचा उमेदवार दौलत दरोडा यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आश्वान केलं आहे.
उमेदवार दौलत दरोडा यांनी महायुती च्या विविध शासकीय योजनामुळे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शहापूर तालुक्याला भरघोस निधी दिल्यमुळे आपण नक्कीच मला मतांचा आशीर्वाद द्याल यात शंका नाही असं म्हटलं आहे.कार्यक्रमा चे सूत्रसंचालन शहापूर टालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष डॉ. मनोहर सासे यांनी केले.
याप्रसंगी मा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, शहापूर विधानसभा प्रमुख अशोक इरनाक,शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव, महिला टालुका अध्यक्ष निशिगंधा बोंबे, राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे, प्रदेश चिटणीस डी. के. विशे सर, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना तारमळे, ठाणे जिल्हा निरीक्षक माया कटारिया,शहापूर तालुका अध्यक्ष सविता मोरगे, अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष उस्मान शेख, राष्ट्रवादी काँग्रेस चे ठाणे जिल्हा आणि शहापूर तालुका कार्यकारिणीचे विविध फ्रंट सेल चे पदाधिकारी, शिवसेना शहापूर तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, शहापूर संपर्क प्रमुख आकाश सावंत, गटनेत्या डॉ. कामिनी सावंत, आरपीआय (आठवले गट )ठाणे जिल्हाध्यक्ष विनोद थोरात, शहापूर तालुका अध्यक्ष जयवंत थोरात आणि संपूर्ण महायुतीचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सदर ठिकाणी नारळ वाढविणे, प्रचाराचा शुभारंभ टिपण्यासाठी तालुक्यातील पत्रकार मंडळी आवर्जून उपस्थित होती. तसेच शहापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यानी स्वतः जातीने लक्ष ठेवत या संपूर्ण कार्यक्रम साठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.