टिटवाळा(ठाणे)येथील रिजन्सी गृह निर्माण संकुला मध्ये संविधान दिन उत्साहात साजरा….
टिटवाळा (कल्याण) : प्रफुल्ल शेवाळे
टिटवाळा येथील रिजन्सी गृह निर्माण संकुलामध्ये भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
भारतीय राज्यघटना स्वीकारून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, मंगळवारी (२६ नोव्हेंबर) रोजी संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
विविध धर्म, संप्रदाय, भाषा, चालिरीती असतानाही, सर्वांमध्ये एकात्मता उत्पन्न करणारे असे देशाचे संविधान आहे. या संविधानाने आपल्या देशात अद्वितीयरितीने लोकशाही शासन दृढमूल केले आहे., म्हणून त्याचे आपल्या जीवनात महत्व आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या उत्तुंग प्रतिभेची ते साक्ष आहे, असे प्रतिपादन सम्यक संबोधी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डी. व्ही. कांबळे यांनी केले आहे.
संकुलामधील ऍड. शेखर वाकोडे यांनी
जगातील अप्रतिम व भव्यदिव्य असे लोकशाहीवादी संविधान हे भारतीयासाठी अभिमान व गौरवाची बाब आहे असं यावेळी म्हटलं आहे.
काही जातीवादी लोक संविधान एका दलित समुदायातून आलेल्या व्यक्तीने लिहिले म्हणून त्याचा गौरव करण्यास पुढे येत नाहीत, शिवाय संविधान दिनाच्या कार्यक्रमात येत नाहीत. त्या लोकांना मला सांगायचे की एकदा संविधान वाचा आणि यातील काही गोष्टी साठी जर आपल्याला जातीमुळे, धर्मामुळे, भाषेमुळे, प्रांतामुळे, लिंगामुळे कुठल्याही प्रकारचे अधिकार जर प्रतिबंधित केले असते तर…? आर्टिकल -१९ जरी नसते तर..? आज देशात त्या समाज, जाती, धर्म यांची काय अवास्था असती…?असा प्रश्न ऍड. वाकोडे यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या भारतीय चिंतनातून प्रकटलेल्या चतुःसूत्रीच्या आधारावर संविधानाची निर्मिती झाली आहे. संविधानाच्या हस्तलिखित प्रतीमध्ये एकूण बावीस चित्रे चितारली आहेत. ज्यात गुरूकुल, लंकाविजय, राजा विक्रमादित्याची राजसभा, अर्जुनाला गीतेचा उपदेश करणारे भगवान श्रीकृष्ण, तीर्थंकर महावीर, सिद्धार्थ गौतम, वैदिक आश्रम असे आपल्या गौरवशाली इतिहासातले प्रसंग चितारले आहेत.
आज भारतात संविधान साक्षरता आणि सजगता यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे,असं प्रतिपादन प्रतिष्ठान चे सचिव पंडित चंद्रमोरे यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करून सुरु झालेल्या या समारंभात सुरवातीला सर्व उपस्थित नागरिकांनी संविधानाची उद्देशिका सामुदायिक म्हटली आहे.कार्यक्रमाला उपस्थिती मध्ये सम्यक संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डीव्ही कांबळे,सचिव पंडित चंद्रमोरे, खजिनदार विजय मोहिते, सह खजिनदार रजनीकांत आढाव, ऍड.शेखर वाकोडे,दादा किस्मतराव,के.डी कदम,के.के पगारे, खराटे, पिंपळे,अमोल रिकामे, ऍड.लता गायकवाड, अंजली कदम,मनीषा चंद्रमोरे, प्रीतम निकम, वसंत मोरे, विनोद इंगळे, शिरसाट,विलास भारती, प्रफुल्ल शेवाळे, बाळकृष्ण भोसले, घोडेस्वार,सुरेश मुळीक, सुरेश जाधव, महेंद्र वाकोडे, शिवराम गायकवाड,यांची उपस्थिती होती.