नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसला मोठा धक्का; इगतपुरीतील आमदार हिरामण खोसकर यांनी काँग्रेस च्या हाता ची साथ सोडली…अजितदादा यांच्या राष्ट्रवादी चे घड्याळ हाती…
खोसकर यांनी अजितदादा यांचे घड्याळ हातावर बांधलं आहे …
मुंबई :- प्रफुल्ल शेवाळे
विधानसभा निवडणूकी पूर्वी कॉंग्रेसला मोठा धक्का सहन करावा लागतोय…
इगतपुरीतील काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी त्यांच्या समर्थकांसह खोसकर यांनी पक्षात प्रवेश केला. हिरामण खोसकर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा अमेक दिवसांपासून रंगली होती. अखेर या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. अहवालानुसार काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याची कुणकुण राजकीय वर्तुळात होती. त्यानंतर त्यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला. याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण 15 आमदार आहेत. यात हिरामण खोसकर हे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत.