शहापूर(जि.ठाणे )तालुक्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची (ACB)कारवाई… शहा सरूपचंद विदयालयाचे संचालक ताब्यात….
शहापूर : प्रफुल्ल शेवाळे
शहापूर - किनवली परिसरातील शहा सरूपचंद विदयालयमधील एका तक्रारदाराने आपलं दोन वर्षाचं रोखलेले वेतन वाढ पूर्ववत करण्यासाठी विद्यालयाचे संचालक चंद्रकांत धानकें यांना विचारणा केली असता धानके यांनी तक्रारदारा कडे रु.१,१०,००० रकमेची मागणी केली. या अनुषंगाने तक्रार दाराने सदर रक्कम धानके यांना देण्यासाचे कबूल केले आणि सदर माहिती लाच लुचपत प्रतिबंधक, ठाणे विभागाला कळविली.. यानंतर दि १४ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने व्यवस्थित रित्या सापळा रचून हरिभाऊ धानके यांना रु.१,१०,००० ची रक्कम घेताना रंगे हाथ पकडले आणि ताब्यात घेतले.
सदर सापळा पथकामध्ये पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके, महिला पोलीस हवालदार जयश्री पवार, पोलीस नाईक विनोद जाधव, पोलीस नाईक बाळू कडव आदी सहभागी झाले होते.
सदर कारवाई करीता प्रमुख मार्गदर्शक संदीप दिवाण, अप्पर पोलीस आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई आणि अतिरिक्त पदभार ठाणे परीक्षेत्र, तसेच महेश तरडे आणि गजानन राठोड अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे,यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या संपूर्ण प्रकरणानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन केलं आहे.ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
अँटी करप्शन ब्यूरो, ठाणे कार्यालय दुरध्वनी – 022 2542 7979
@ टोल फ्रि क्रं. 1064