मूर्तिजापूर (जि. अकोला )मतदार संघातील विधानसभा इच्छुक उमेदवार मुंबई येथे एकाच बैठकित तिकिटाच्या प्रतीक्षेत…
मुंबई, २० ऑक्टोबर – प्रफुल्ल शेवाळे
राज्यतला एकमेव तिरंगी लढत होणारा मूर्तिजापूर मतदार संघ. तिरंगी लढत म्हणजे महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी….
सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मूर्तिजापूर मतदार संघ महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरद पवार गट निवडणूक लढवणार असल्याचे समजते. अशातच या मतदारसंघात जवळपास 18-19 उमेदवार हे एकट्या राष्ट्रवादी शरद पवार गटामधून आपलं कसंब पणाला लावू पाहणार आहेत…पण खरी लढत ही जवळपास 4 उमेदवार यांच्या मध्ये असणार आहे.. चार उमेदवार म्हणेज मागील विधानसभा मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणारे रवी राठी, सम्राट डोंगरदिवे, ऍड.शेखर वाकोडे, तेजस जामटे आदी उमेदवार आज मुंबई मध्ये यशवंत राव चव्हाण सेंटर मध्ये एकत्र पहायला मिळाले. यांच्या सोबत राष्ट्रवादी-शरद पवार गट जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता तेजस्विनी बारबदे आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष संग्राम गावंडे यांनी म्हटलं आहे की इच्छुक उमेदवारांचा गोपनीय अहवाल आपण पक्षश्रेष्टींना पाठवला आहे.. यावर पक्ष श्रेष्टी कुणाला उमेदवारी देतात हे पाहणं आता महत्त्वचं आहे. आताच्या घडीला प्रत्येक उमेदवार ज्याच्या त्याच्या पद्धतीने उमेदवारी मिळण्यासाठी आपलं कसब पणाला लावत आहे.. पण प्रत्यक्ष मध्ये मूर्तिजापूर तिकीट कुणाला मिळणार हे येत्या 1/2 दिवसात स्पष्ट होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
एकमेकांच्या विरोधात असणारे हे चार ही उमेदवार आज यशवंतराव सेंटर मध्ये मन मोकळ्या गप्पा मारताना दिसत होते.