उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे ठाणे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी – भरत गोंधळे
ठाणे – प्रफुल्ल शेवाळे
संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पूर्ण ठाणे जिल्ह्यातील शहापूर, वाडा, मुरबाड, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ अशा विविध भागात भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या परिस्थिती मुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. हाता तोंडाशी आलेला घास निघून चाललाय अशी परिस्थिती परतीच्या पावसाने केली आहे. संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष भरत गोंधळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कडे ठाणे ग्रामीण भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच ठाणे जिल्हाधिकारी आणि तालुक्यातील तत्सम तहसीलदार यांनी शेती चे पंचनामे करून संबंधित अहवाल सादर करावा अशी मागणी सुद्धा गोंधळे यांनी केली आहे. संबंधित शेतकरी वर्गाला निश्चित पणे मोबदला मिळावा यासाठी अजितदादा यांना पत्र पाठवून सदर मागणी करणार आहोत असं गोंधळे यांनी म्हटलं आहे.