: ”मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार”, आदिती तटकरेंचं मोठं विधान
मुंबई :- प्रफुल्ल शेवाळे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असा प्रचार विरोधकांकडून सध्या सूरू आहे. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच सरकारने आतापर्यंत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे 7500 रूपये जमा केले आहेत.
लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.
पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असा प्रचार विरोधकांकडून सध्या सूरू आहे. मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. तसेच सरकारने आतापर्यंत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरपर्यंतचे 7500 रूपये जमा केले आहेत. त्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्यात येणाऱ्या पैशाची प्रतिक्षा लागली आहे. तर हे पैसे देखील महिलांना डिसेंबरमध्येच मिळणार आहेत, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
आदिती तटकरे यांनी एक्सवर ट्वीट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्या नेमक्या काय म्हणाल्या आहेत? हे जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे.
सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती !
निवडणूक आयोग काय म्हणाले?
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सरकारच्या सर्व विभागांकडे आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजनांची माहिती विचारली होती. त्यात महिला व बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेंतर्गत मोठा आर्थिक लाभ दिला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार आयोगाने या विभागाकडून यासंबंधीची योग्य ती माहिती मागवली होती. त्यात विभागाने या योजनेला केला जाणारा निधीचा पतपुरवठा 4 दिवसांपूर्वीच थांबवण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती. याचा अर्थ निवडणूक आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
‘इतक्या’ महिलांनी घेतला योजनेचा लाभ
दरम्यान आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने आतापर्यंत 2 कोटी 20 लाख महिलांनी लाभ घेतला होता. या महिलांच्या खात्यात आतापर्यंत जुलै ते नोव्हेंबर अशा 5 महिन्यांचे 7500 रूपये जमा झाले आहेत. यानंतर आता महिलांना पुढच्या हप्त्याची म्हणजेच डिसेंबरमध्ये हाती येणार निधीची उत्सुकता असणार आहे. हा निधी देखील महिलांना डिसेंबर महिन्यात मिळणार आहे. त्यामुळे योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.