16 उमेदवारांच्या नावासहित वंचित ची चौथी यादी जाहीर
मुंबई :- प्रफुल्ल शेवाळे
राज्यात एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावरून खटके उडत असताना तिकडे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीत 16 उमेदवारांची नावे आहेत.
आतापर्यंत 67 मतदारसंघात वंचित कडून उमेदवार जाहीर
विधानसभा निवडणुकांसाठी वंचितच्या 11 उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांपूर्वीच जाहीर केली होती. त्यामध्ये, वंचितकडून विधानसभा निवडणुकांसाठी प्रथमच तृतीयपंथी उमेदवार शमिभा पाटील यांना रावेर मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं. त्यानंतर 10 मुस्लीम उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता 16 उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.
वंचितची चौथी यादी
अलीबाबा रशिद तडवी : शहागा
भिमसिंग बटन : साक्री
भगवान भोंडे : तुमसर
दिनेश रामरतन पंचभाई : अर्जुनी मोरगाव
दिलीप राठोड : हदगाव
रमेश राठोड : भोकर
दिलीप तातेराव मस्के : कळमनुरी
मनोहर जगताप : सिल्लोड
अय्याज मकबूल शाह :कन्नड
अंजन लक्ष्मण साळवे : औरंगाबाद पश्चिम
अरूण सोनाजी घोडके : पैठण
आरीफ अब्दुल्ला खान देशमुख : महाड
प्रियांका शिवप्रसाद खेडकर : गेवराई
वेदांत सुभाष भादवे : आष्टी
चंद्रकांत जानू कांबळे : कोरेगाव
संजय कोंडीबा गाडे : कराड दक्षिण
दरम्यान वंचितकडून पहिल्या तीन यादीतून 51 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. चौथ्या यादीत 16 उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत 67 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.