भाजप ची पाहिली यादी आली समोर…अजितदादा आणि शिंदे आपले पत्ते केव्हा उघडणार

भाजप ची पाहिली यादी आली समोर…
अजितदादा आणि शिंदे आपले पत्ते केव्हा उघडणार?

मुंबई – प्रफुल्ल शेवाळे

महायुतीने विधानसभा निवडणुकीत खऱ्या अर्थाने आघाडी घेतली. आज भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत सध्या 99 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. पूर्वीच्याच काही आमदारांना संधी देण्यात आली आहे. आता शिंदे आणि अजितदादा गट पत्ते कधी उघडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भाजपची पहिली यादी आली, शिंदे आणि अजितदादा गटाची कधी?

कुणाच्या गळ्यात पडणार उमेदवारीची माळ?

शिंदे गट, अजितदादा कधी पत्ते उघडणार ?

राज्याच्या राजकारणात महायुतीने आघाडी घेतली आहे. विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात भाजपने उमेदवार उतरवले आहेत. भाजपने राज्यातील 99 मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पूर्वीच्याच काही आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत दोन आमदारांना नारळ देण्यात आल्याचे समोर येत आहे. दरम्यान आता आता शिंदे आणि अजितदादा गट पत्ते कधी उघडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीत मोठी खलबतं

महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी या आठवड्याच्या अखेरीस मॅरेथॉन बैठकी झाल्या. अगोदर दिल्ली आणि नंतर चंदीगड येथे रात्री उशिरापर्यंत बैठकी झाल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात जोरदार चर्चा झाली. या बैठकीत भाजपला 151, शिंदे गटाला 84 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 53 जागा मिळाल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. काही जागांवर वाद असल्यास अथवा बंडखोरी होण्याची भीती असल्यास सामोपचाराने त्यावर तोडगा काढण्याची सूचना देण्यात आल्याचे समोर येत आहे. मुंबईमध्ये भाजप आणि शिंदे गटाने मोठ्या संख्येने जागा पदारात पाडून घेतल्याचे समोर येत आहे. त्यात भाजप 18, शिंदे गट 16 तर अजित पवार गटाच्या वाट्याला दोन जागा आल्याची सूत्रांची माहिती आहे.

उत्तर महाराष्ट्रात दादांचा वरचष्मा?

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात दादांचा वरचष्मा दिसू शकतो. इगतपूरी, येवला, दिंडोरी, कळवण, सिन्नर, देवळाली, निफाड विधानसभा मतदारसंघात दादांचा वरचष्मा आहे. तर मालेगाव बाह्य आणि नांदगावमध्ये शिंदे गटाचा शिलेदार असू शकतो. नाशिक मध्य, पश्चिम, पूर्व, चांदवड आणि बागलाणमध्ये भाजपचा उमेदवार असेल.

शिंदे-अजित पवार गटाची यादी केव्हा?

महायुतीतील मोठा भाऊ भाजपने सुरुवातीला उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्यात 99 उमेदवारांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवण्यात आले आहे. आता जागा वाटपातील त्रिसुत्रीनुसार इतर दोन घटक पक्ष त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर करतील .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गट लवकरच यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. आजच्या भाजपच्या यादीत जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. त्यांची उर्वरीत यादी पण लवकरच समोर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!