माजी आमदार परशुराम उपरकार यांची शिवसेना ठाकरे गटात घर वापसी… हाती मशाल घेण्याचा निर्धार…
मुंबई :- प्रफुल्ल शेवाळे
माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक खलबते सुरू झाली आहे. अशामध्ये पक्षप्रवेशाच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी कोकणातील नेते राजन तेली यांनी भाजपमधून बाहेर पडत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर कोकणातील आणखी एका नेत्याने शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केले आहे. परशुराम उपरकर यांनी रविवारी (20 ऑक्टोबर) मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत प्रवेश केला. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाने कोकणातील सिंधुदुर्गात बळ वाढणार आहे.
तब्बल 12 वर्षांनी परशुराम उपरकर हे स्वगृही परतले आहेत. परशुराम उपरकर हे सिंधुदुर्गात एक मोठे नाव आहे. नारायण राणे यांनी बंड केले पण त्यांनी तेव्हा शिवसेना सोडली नव्हती. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गात नारायण राणेंविरोधात विधानसभेची पोटनिवडणूक लढवली होती. पण त्या निवडणुकीत परशुराम उपकर यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. तरीही शिवसेनेने त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली होती. त्यानंतर पुढच्या काळात परशुराम उपरकर यांनी शिवसेना सोडली आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे.
मनसेत प्रवेश केल्यानंतर परशुराम उपरकर यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्षपदही भूषवले होते. पण, लोकसभा निवडणुकीआधी ते मनसेतूनही अभ्र पडले. त्यामुळे पुढे ते कोणत्या पक्षात जातील? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर याला पूर्णविराम देत ते पुन्हा एकदा स्वगृही परतले आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांनीही मशाल हाती घेत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना उबठा आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार विनायक राऊत, संदेश पारकर, सतीश सावंत, अतुल रावराणे, संजय पडते, संग्राम प्रभुदेसाई इत्यादी उपस्थित होते.