शहापूर चे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांचा उमेदवारी अर्ज दाखल …आ.दरोडा यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन
शहापूर :- प्रफुल्ल शेवाळे
शहापूर – शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांनी आज दि.२८ ऑक्टोबर रोजी आपला विधानसभा उमेदवारी अर्ज शहापूर तहसीलदार यांच्या कडे दाखल केला आहे .दरोडा यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. आणि राष्ट्रवादी च्या घड्याळ चिन्हावर ही निवडणूक लढली जाणार आहे. आतापर्यंत दरोडा यांनी ६ विधानसभा लढविल्या आहेत, त्यापैकी ४ निवडणूक जिंकल्या आहेत तर २ वेळेस त्यांना हार स्वीकारावी लागली आहे. शहापूर विधानसभा मतदार संघ अनुसचित जमाती करिता राखीव मतदार संघ आहे.
यावेळेस भाजपा, शिवसेना आणि इतर घटक पक्ष अशी महायुती म्हणून निवडणूक लढवली जाणार आहे.आज दि.२८ ऑक्टोबर रोजी महायुती च्या मित्र पक्षांना घेऊन आमदार दौलत दरोडा यांनी मोठया प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले आहे..
उमेदवारी अर्ज दाखल करण्याअगोदर आ. दरोडा यांच्या प्रचार कार्यालया चे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर दरोडा यांनी अंबिका माता मंदिरात जाऊन अंबिका मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर रॅली मध्ये पुढे जात असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेला आणि पंचायत समिती येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धा कृती पुतळ्याला आ. दरोडा यांच्या कडून अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस चे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत भाऊ गोंधळे यांनी या निवडणुकीत जीवाचं रान करून, अपार मेहनीतीच्या जोरावर महायुती आणि घटक मित्र पक्षांना सोबत घेऊनच सदर निवडणूकी मध्ये नक्कीच यश संपादन करू असं म्हटलं आहे. तर तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे यांनी कार्यकर्त्यांच्या विविध बैठका नियोजन सुरु केलं आहे. महिला जिल्हा ग्रामीण अध्यक्षा सौ. कल्पना तारमळे, तालुक्यातील महायुती आणि इतर महिला वर्गाची महिलाशक्तीची ताकद यावेळी निवडणूकी साठी पूर्णपणे वापरणार आहोत असं म्हणाल्या आहेत.
उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या आजच्या रॅली मध्ये महायुती चे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी,रिपाई (आठवले गट )आणि मित्र पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सामील झाले होते.
यात प्रामुख्याने भाजपा जिल्हा अध्यक्ष ठाणे ग्रामीण जितेंद्र डाकी,प्रदेश समन्व्यक भरत पाटील, शहापूर तालुका विधानसभा प्रमुख अशोक इरनाक, शेखर अधिकारी, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, सचिव भरत बागराव,शिवसेनेचे आकाश सावंत, डॉ कामिनी सावंत, अरुण कासार, निलेश भांडे ,पद्माकर वेखंडे,राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे,प्रदेश चिटणीस डी. के. विशे सर,ठाणे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी अध्यक्ष भरत, गोंधळे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. कल्पना तारमळे,ठाणे जिल्हा राष्ट्रवादी प्रवक्ते मुकेश दामोदरे,अल्पसंख्यांक अध्यक्ष उस्मान शेख, शहापूर तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे, महिला तालुका अध्यक्ष सविता मोरगे, तालुका युवक अध्यक्ष दिनेश चंदे, शहापूर तालुका आणि ठाणे जिल्हा कार्यकारिणी विविध फ्रंट सेल चे अध्यक्ष,चे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
शहापूर मध्ये यंदा महाविकास आघाडी, मनसे, जिजाऊ अपक्ष अशी बहुरंगी लढत होणार आहे.. या सर्वात मतदार राजा कौल कुणाला देणार हे निवडणूक निकाल म्हणेज २३ नोव्हेंबर ला समजणार आहे.