दुर्गम आणि दुर्लक्षित पाड्यांमध्ये उजेड पेरण्याचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न आणि सहकार्याने दिवाळी साजरी…

दुर्गम आणि दुर्लक्षित पाड्यांमध्ये उजेड पेरण्याचा महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न आणि सहकार्याने दिवाळी साजरी…

दिवाळी उत्साहाचा, आंनदाचा व प्रकाशाचा सण…पण राज्यातील, जिल्ह्यातील अनेक गावं वस्त्या या विकासापासून आजही वंचित…

कसारा (जि. ठाणे ) – प्रफुल्ल शेवाळे

स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही जिथे अजून विकासाचे वारे पोहोचलेच नाहीत,खरोखर एक शोकांतिका म्हणावं लागेल..

मुख्यमंत्री महोदयांच्या ठाणे जिल्ह्यातील कसारा नजीक काही खेड्यापाड्यांमध्ये आनंदाची आणि उत्साहाची पेरणी करण्याच्या हेतूने प्रकाश मान दिवाळी साजरी करण्यात आली आहे. महावितरण मधील काही कर्मचाऱ्यांनी आपल्या संपर्कातील दानशूर मित्रमंडळींच्या सहाय्याने ठाणे जिल्ह्यातल्या कसारा नजीक च्या खडकवाडी, आघाणवाडी व खरंब्याचा पाडा या विहीगावनजीक पाड्यांतील प्रत्येक घरात तीन चार आठवडे पुरेल इतक्या किराणा सामानाचे वाटप केले. सोबतच प्रत्येक घरात इन्व्हर्टर बल्ब, लहानग्यांना खाऊ व खेळणी तसेच महिलांना साड्या साडी वाटप करण्यात आले.

ध्येय एक्याचे या महावितरण कर्मचारी वर्गाच्या सामाजिक बांधिलकी व्हाट्सअप समूह सदस्य सचिन गायकवाड, मोहित वाघ, मयुर लोखंडे, संतोष आव्हाड व प्रकाश कांबळे ह्यांनी पाड्यातल्या विद्युत पुरवठा संदर्भातील अडचणींचे निराकरण करुन पाड्यातील घरांमध्ये नवीन वीज कनेक्शन मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
आनंद घायवट, गणेश सदगीर, सरिता सावरे व शारदा भोजणे ह्यांनी पाड्यातील अंगणवाडी व जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेतला.

समूहातर्फे पाड्यात पुढील वर्षभर विविध उपक्रम राबवून पाड्यातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी वर्षभर प्रयत्न करणार असल्याचा निर्धार समूहाच्या सदस्या अलका कदम, काजल घायवट, सरिता भोजणे व विकास खंदारे ह्यांनी व्यक्त केला.

एकीकडे विकासासाठी आणि विकासाच्या नावाने मत मागणारे राज्यकर्ते,विविध पक्षांची राजकारणी मंडळी खरोखर अशा ठिकाणी पोहचतील का???

केवळ जाहिरातीमध्ये दिसणारा विकासाचा रस्ता ह्या खेड्यापाड्यांतील घरापर्यंत कधी पोहोचेल??

राज्याच्या, देशाच्या प्रगतीचा इतका डंका पिटत असताना, सरकारचा विकास आणि गतिमानता दाखवण्यासाठी हजारो कोटी जाहिरातींवर खर्च होत असताना मुंबईच्या शेजारच्या जिल्ह्यात ही अवस्था असेल तर ह्या विकासाच्या बाता किती पोकळ आहेत, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!