राज्यात महायुती चे हात बळकट करा, पुन्हा एकदा महायुतीला आशीर्वाद दया.. – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

राज्यात महायुती चे हात बळकट करा, पुन्हा एकदा महायुतीला आशीर्वाद दया.. – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

शहापूर – प्रफुल्ल शेवाळे

राज्यातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन जाणारं आमचं महायुतीचं सरकार आहे.प्रत्येक समाजातील सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारची आहे.येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे हात पुन्हा बळकट करण्यासाठी
महायुतीच्या पाठीशी आपण खंबिरपणे उभे राहा आणि पुन्हा हे महायुतीचं सरकार सत्तेत आणा व शहापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार दौलत दरोडांना विजयी करा असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहापूर तालुक्यातील मतदारांना केलं आहे.

शुक्रवारी सायंकाळी चार वाजता शहापूर विधानसभेचे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दौलत दरोडा यांच्या प्रचारासाठी शहापूर येथील ग.वी.खाडे विद्यालयाच्या आपल्या प्रचार जाहीर सभेमध्ये आवाहन केले आहे

काय म्हणाले अजितदादा पवार,-

शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने आपला महाराष्ट्र पुढे चालला आहे. मी राष्ट्रवादी चा एक कार्यकर्ता असून याच विचारधारेवर पुढे जात असतो. आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करतो. शहापूर चे राष्ट्रवादी चे धडाडीचे नेतृत्व आणि महायुती चे उमेदवार आमदार दौलत दरोडा यांनी शहापूर मतदार संघात विविध लोकोपयोगी उपक्रम या ठिकाणी राबवले आहेत.शहापूर मध्ये केलेल्या विकास कामामुळे खऱ्या अर्थाने या भागाचा विकास झालेला आहे..

शहापूर विधानसभेला दौलत दरोडा यांच्या रूपाने एक धडाडीचा कार्यकर्ता मिळालेला आहे. या मतदार संघात आदिवासी बांधवाकरिता दौलत सातत्याने झटत असतो, हे मी स्वतः पाहिलं आहे.आदिवासी बांधवाना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे.या भागात सिंचनाचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, रोजगार प्रश्न सोडवण्यासाठी दौलत ने या ठिकाणी प्रयत्न केले आहेत.शहापूर करांच्या सुख दुःखात, संवेदनशील पणे दौलत नेहमीच सामील असतो हे देखील आम्ही अनुभवलं आहे.

शहापूरकरांच्या आशा, आकांशा, अपेक्षा च्या पूर्तता करण्यासाठी दौलत हा नेहमी माझ्याकडे, मुख्यमंत्री शिंदेसाहेब , उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि सरकार मधल्या विविध मंत्र्याना भेटत आलेला आहे, आणि पाठपुरावा केलेला आहे.सामाजिक बांधीलकी जपून दौलत ने केलेली धडपड माझ्या माहिती प्रमाणे शहापूर ची जनता कधी विसरणार नाही. एक कर्तव्य दक्ष, संवेदनशील, कार्यक्षम अभ्यासू नेतृत्व म्हणून दरोडा यांनी आपली वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण केलेली आहे.अतिशय तरुण वयात दौलत ने आमदारकी मिळवली. शहापूर करानो मी नेहमी सांगत असतो, यश आले म्हणून हुरळून जायचं नाही आणि अपयश आलं म्हणून खचून जायचं नाही. स्व. दशरथ तिवरे यांची आठवण या निमीत्तानं येत आहे. त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.

शहापूर परिसरात घड्याळ हे मतदारांना जवळचे वाटतेय. विरोधात उमेदवार हा माझ्या माहितीतला असून… त्या गड्याने इकडून तिकडे पलट्या मारतोय . दौलत हा शिवसेनेचा हाडाचा कार्यकर्ता.. पण योगायोग तो आमच्यकडे आला आणि 2019 ला आमदार झाला. आता पुन्हा एकदा आपल्या समोर उभा आहे.गेली 30-35 वर्ष काम करत असताना राष्ट्रवादी ची एक मोठी ताकद ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आहे. पालघर जिल्ह्याची निर्मिती साठी मी पुढाकार घेतला. हजारो कोटी रु. खर्च केले आणि पालघर जिल्हा निर्माण झाला. विकासात्मक कामासाठी करोडो रुपयांचा निधी आम्ही दिला.

शहापूर बस स्थानक, पोलीस स्टेशन, तहसीलदार, अग्निशमन केंद्र करिता आपण नवीन प्रशासकीय इमारत बांधणार आहोत. मी कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता आहे.मिळालेल्या सत्तेचा वापर हा जनसामान्यांसाठी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो, समाजातील सर्व घटकांसाठी आम्ही महायुती च्या माध्यमातून कामं करीत आहोत. लोकसभेला आम्हाला कांदा निर्यात प्रकरणी आम्हाला फटका बसला.. आता आम्ही गाफिल राहणार नाही. संविधान बदलणार या विरोधकांच्या निव्वळ वावड्या होत्या.. अब की बार 400पार आणि मग संविधान बदलणार.. असं काही नाहीये. डॉ. बाबासाहेब यांची घटना संविधान अतिशय मजबूत आहे. याला कधीच धक्का लागणार नाही.या निवडणूक तब्ब्ल 175 पर्यंत आपल्या जागा आणायच्या आणि एक स्थिर सरकार महाराष्ट्र ला द्यायचं आहे.

केंद्राचा मोठा निधी महाराष्ट्र ला भेटला पाहिजे. राज्याचा मोठा विकास झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. पालघर मधील वाढवण बंदर हे दजगातील 10बंदर पैकी एक असेल. या प्रकल्पनाला पाऊण लाख कोटी आम्ही दिले आहेत.

पालघर मध्ये नवीन विमानतळ आम्ही उभारणार आहोत.

समृद्धी महामार्ग लवकरच सुरु होणार आहे. या बरोबर बुलेट ट्रेन चं काम सुरु असणार आहे. राज्यात एअरपोर्ट, टर्मिनल, मेट्रो, अशी अनेक विकासाची कामे चालू आहेत. सध्या एक लाख कोटीची कामं चालू आहेत. गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने दहा लाख कोटी राज्यातल्या विकासकामांना दिले आहेत. विरोधक विकास गुजरात ला चाललंय असं भासवत आहे.. पण आपण नागरिकांनी जरा डोळे उघडून पाहा.. महाराष्ट्र मध्ये विकास कसा चालू आहे.

शहापूर करानो दौलत ला निवडून दया.. महायुती सरकार आणा.. आम्ही लाखो कोटींचा निधी केंद्रातुन आणल्याशिवाय गप्प बसणार नाही.

अर्थसंकल्प सादर करीत असताना विविध गोष्टी लक्षात घेतल्या… शेतकरी विज बिल माफ, दुधाला भाव, विकासासाठी निधी तरतूद, युवकांना प्रशिक्षण स्टायपेंड आणि यातून आम्ही लाडकी बहीण योजना अमलात आणली.

पर्यटनला आम्ही चालना देणार आहोत, यातून विविध रोजगार निर्मिती साठी आमचा प्रयत्न असणार आहे. माहुली किल्ल्यावर रोप वे सुविधा, आजोंबा पर्वत साठी विकासासाठी, जांबे धरणं, चेरवली मठ, शेलवली खंडोबा मंदिर साठी प्रोत्साहन देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.

याचबरोबर
शहापूर तालुक्यात सुसज्ज असे क्रीडासंकुल उभारणी, समृद्धी महामार्गावर सुसज्ज असे रुग्णालय उभारणी करणे, माहुली किल्ल्यावर रोप वे ची सुविधा,
आजोबा पर्वत व परिसर विकसित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न, समृद्धी महामार्ग मुळे जे नुकसान झाले आहे, त्याची नुकसान भरपाई मिळणे बाबत प्रयत्न, भातसा डाव्या कालव्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे, इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा यासाठी प्रयत्न, . ठाणे जिल्ह्यातील 35 सेक्शन रद्द करण्यात यावा याकरिता प्रयत्न, तालुक्यात वारकरी भवन निर्माण करणे, शहापूर तालुका करिता तहसीलदार, पोलीस ठाणे आणि पंचायत समिती, नगर पंचायत कार्यालय करिता नवीन प्रशासकीय इमारत बांधणे, तालुक्यात रोजगार निर्मिती केंद्र उभारणे, कसारा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारणे अशी कामं भविष्यात शहापूर वासियांना पहायला मिळणार आहेत.
म्हणून अशा सगळ्या विकास कामासाठी आम्ही बांधील आहोत.. आणि यासाठी आपल्या लाडक्या दौलत दरोडा ला आपण शहापूर करानी मोठया मतांनी विजयी करा असं आवाहन अजितदादा यांनी केले आहे.

या प्रचारसभेसाठी भाजपा नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश पाटील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मारुती धिर्डे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रमोद हिंदुराव, जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे, प्रदेश डी. के.विशे सर, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना तारमळे,तालुका अध्यक्ष मनोहर सासे, महिला तालुका अध्यक्ष सविता मोरगे, भाजप जिल्हाध्यक्ष जितेंद्र डाकी, शहापूर तालुका विधानसभा प्रमुख अशोक इरनाक, भाजपाचे शहराध्यक्ष विवेक नार्वेकर,भाजप महिला तालुका अध्यक्ष निशिगंधा बोंबे, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, शिवसेना नेते आकाश सावंत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष विनोद थोरात तालुकाध्यक्ष जयवंत थोरात यांसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शिवसेना भाजपा आरपीआय श्रमजीवी संघटना या महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!