शहापूर (ठाणे) महाराष्ट्र विधानसभा मतदार संघामधून महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा विजयी…अटीतटिच्या लढाई मध्ये मारली बाजी…

शहापूर (ठाणे) महाराष्ट्र विधानसभा मतदार संघामधून महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा विजयी…अटीतटिच्या लढाई मध्ये मारली बाजी…

ठाणे : प्रफुल्ल शेवाळे

शहापूर – ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस चे आणि महायुतीचं एकमेव उमेदवार दौलत दरोडा हे अटी तटीच्या लढाई मध्ये विजयी झाले आहेत. शहापूर राखीव (अ. जा )मतदार संघातून दौलत दरोडा हे पाचवेळा विजयी झाले आहेत.दौलत दरोडा यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा यांना पराभूत केले आहे. अतिशय चूरस पूर्ण लढाई या मतदार संघात पाहायला मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष भरत गोंधळे यांनी दरोडा यांचा विजय म्हणजे समस्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मेहनतीचे फळ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर महिला जिल्हा अध्यक्ष सौ. कल्पना तारमळे यांनी समस्त लाडक्या बहिणींनी दरोडा आणि अजितदादा यांना मतांचा आशीर्वाद देऊ केला आहे आणि आमदार दरोडा हे पुन्हा एकदा विजयी झाल्याचे म्हटलं आहे..

शहापूर तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे यांनी मिळालेला विजय हा तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या निरंतर धडपड, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्राप्त झाला असल्याचे म्हटलं आहे.

शहापूर तालुक्यातील समस्त महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गुलाल उधळून जल्लोषा साजरा करताना दिसत आहेत.

आता महायुती सरकार मध्ये दौलत दरोडा यांची मंत्री पदी वर्णी लागेल असं बोललं जात आहे…

तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया..

आमदार दौलत दरोडा यांनी शहापूर च्या विकासासाठी प्रकर्षाने काम करणे गरजेचे आहे…
-अरविंद भेरे, लेखापरीक्षक वासिंद.

उगवत्याला सलाम,…
आमदार दौलत दरोडा यांनी जाहीर केलेल्या वचन नाम्या प्रमाणे तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लावावीत.
युवराज गोरे, शहापूर.

सामान्य जनतेमध्ये रमणारा आमदार यांना तालुक्यातील सामान्य जनतेने आणि लाडक्या बहिणींनी मोलाची साथ दिली आहे.
मुकेश दामोदरे, प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीण.

आमदार साहेबांच्या विजयासाठी रात्रंदिवस काम करणारे आपले तळागळागळातील कार्यकर्ते, आपल्यावर प्रेम करणारी जनता..यांच्यामुळे हे यश आपणास प्राप्त झाले आहे…आपला विजय नक्कीच आम्हाला आनंद देऊन गेला आहे..कारण आपण महायुतीमध्ये आमदार झाले आहात…याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आपल्या विजय बद्दल आपले हार्दिक हार्दिक मनापासून अभिनंदन..
हरिश्चंद्र अधिकारी,शहापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!