निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगा कडून उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हात काहीसा बदल

निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगा कडून उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हात काहीसा बदल

मुंबई :- प्रफुल्ल शेवाळे

चिन्हामध्ये काही बदल करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी हे नवे सुधारित चिन्ह पक्षाला देण्यात आले आहे.

मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी केली आणि एकसंध शिवसेना फुटली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्या पक्षाचे नाव तसेच चिन्ह देखील गेले. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना वेगळे चिन्ह तसेच नाव देखील दिले. त्यांना देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावरच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांना या निवडणुकीत यश देखील मिळाले. मात्र, या चिन्हामध्ये काही बदल करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी हे नवे सुधारित चिन्ह पक्षाला देण्यात आले आहे.

नव्याने अस्तित्वात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले. मात्र, लोकसभा निवडणुकीत या चिन्हाच्या रचनेवरून विरोधकांनी त्याची बरीच खिल्ली उडवली होती. आईस्क्रीमच्या कोनासारखे हे चिन्ह दिसत असल्याचे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यात आता बदल केला असून ती आता बॅटरीसारखी दिसणार आहे. वरती पेटत्या ज्वाळा आणि खाली त्याला बॅटरीसारखा आकार देण्यात आला आहे. तसेच या चिन्हाच्या आत असलेला भगवा रंग काढण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या चिन्हावरून विरोधकांनी खिल्ली उडविली होती. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. नव्या सुधारित चिन्हामध्ये टॉर्च स्पष्टपणे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवरही टॉर्च सारखेच दिसणारे नवे निवडणूक चिन्ह दिसणार आहे. पेटत्या मशालीचा आणि शिवसेनेचा फार पूर्वीपासूनचा संबंध आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेने 1985 मध्ये पेटत्या मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. नंतरच्या काळात रेल्वे इंजिन, ताडाच्या झाडाची जोडी, धनुष्यबाण आदी चिन्हे शिवसेनेला मिळत गेली.

शिंदे गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देताना आयोगाने ठाकरे गटाला चिन्हाबाबत पर्याय विचारले होते. तेव्हा ठाकरे गटाने पेटत्या मशालीचा पर्याय आयोगाला दिला होता. याच चिन्हावर ठाकरेंनी लोकसभा लढविली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!