भाजप उमेदवार पहिल्या यादी मधून निवडणूक रिंगणात…

भाजप उमेदवार पहिल्या यादी मधून निवडणूक रिंगणात…

मुंबई – प्रफुल्ल शेवाळे

येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार आहे.
भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपल्या पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून उमेदावारी जाहीर झाली आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपच्या पहिल्या यादीची वैशिष्ट्ये –

भाजपने पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांची नावे घोषित केली आहेत. विद्यमान आमदारांना उमेदवारी घोषित करुन भाजपने कुठेतरी बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय सर्वच मंत्र्यांना आणि विधानसभा अध्यक्षांची उमेदवारी देखील पहिल्या यादीत घोषित केली आहे.
गणेश नाईक भाजपला राम-राम ठोकून शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून नाईक कुटुंबाला तिकीट हवं होतं. मात्र भाजपने गणेश नाईक यांना ऐरोलीतून तिकीट जाहीर करून नाईक यांच्या पक्ष बदलाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
कल्याणमध्ये गोळीबार प्रकरणात तुरुंगात असलेल्या गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना कल्याण पूर्वमधून उमेदवारी जाहीर झाली आहे.
नवी मुंबईत भाजपने एका घरात म्हणजे नाईक कुटुंबांना दोन तिकीट देणे टाळले आहे. मात्र मुंबई आशिष शेलार (वांद्रे पश्चिम) आणि विनोद शेलार (मालाड पश्चिम) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजप नेते अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर केलं होतं.
सोलापूरमध्ये विजयकुमार देशमुख सुभाष देशमुख यांच्या नावाला स्थानिकांचा विरोध होता. मात्र भाजपने विरोध झुगारुन सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख आणि सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
नाशिक शहरात भाजपच्या तीन विद्यमान आमदारांपैकी दोघांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नाशिक पूर्वमधून राहुल ढिकले तर नाशिक पश्चिमला सीमा हिरे यांना उमेदवारी घोषित केली आहे. तर पहिल्या यादीत नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे यांचं नाव नाही.
मुंबईतील भारती लव्हेकर (वर्सोवा), सुनील राणे (बोरिवली), पराग शाह (घाटकोपर पूर्व) यांना पहिल्या यादीत संधी मिळालेली नाही. तर देवयानी फरांदेड (नाशिक मध्य), दादासाहेब केचे, राम सातपुते (माळशिरस) यांची देखील नावे पहिल्या यादीत नाहीत.
प्रतिभा पाचपुते (श्रीगोंदा), विनोद शेलार (मालाड पश्चिम), राजेश बकाने (देवळी), श्रीजया चव्हाण (भोकर), शंकर जगताप (चिंचवड), विनोद अग्रवाल (गोंदिया), अनुराधा चव्हाण (फुलंब्री), सुलभा गायकवाड (कल्याण पूर्व), राहुल आवाडे (इचलकरंजी), अमोल जावळे (रावेर) या उमेदवारांना भाजपने नव्याने संधी दिली आहे.
भाजपने पहिल्या यादीत 13 महिला उमेदवारांना संधी दिली आहे.
भाजप उमेदवारांची नावे
नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
शहादा – राजेश पाडवी
नंदुरबार- विजयकुमार कृष्णराव गावित
धुळे शहर-अनूप अग्रवाल
सिंदखेडा- जयकुमार रावल
शिरपूर- काशिराव पावरा
रावेर – अमोल जावळे
भुसावळ- संजय सावकारे
जळगाव शहर- सुरेश भोळे (राजू मामा)
चाळीसगाव- मंगेश चव्हाण
जामनेर- गिरीश महाजन
चिखली- श्वेता महाले
खामगाव- आकाश फुंडकर
जळगाव (जामोद) – संजय कुटे
अकोला पूर्व- रणधीर सावरकर
धामणगाव रेल्वे- प्रताप अडसद
अचलपूर- प्रविण तायडे
देवळी- राजेश बकाने
हिंगणघाट- समीर कुणावार
वर्धा- पंकज भोयर
हिंगणा- समीर मेघे
नागपूर दक्षिण- मोहन मते
नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे
तिरोरा- विजय रहांगडाले
गोंदिया- विनोद अग्रवाल
अमगाव- संजय पुरम
आरमोरी- कृष्णा गजबे
बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार
चिमूर – बंटी भांगडिया
वणी- संजीव रेड्डी बोडकुरवार
रालेगाव- अशोक उईके
यवतमाळ- मदन येरावर
किनवट- भीमराव केरम
भोकर- श्रीजया चव्हाण
नायगाव- राजेश पवार
मुखेड- तुषार राठोड
हिंगोली- तानाजी मुटकुले
जिंतूर – मेघना बोर्डिकर
परतूर- बबनराव लोणीकर
बदनापूर – नारायण कुचे
भोकरदन- संतोष दानवे
फुलंब्री- अनुराधा चव्हाण
औरंगाबाद पूर्व- अतुल सावे
गंगापूर- प्रशांत बंब
बगलान- दिलीप बोरसे
चांदवड- राहुल अहिर
नाशिक पूर्व- राहुल ढिकले
नाशिक पश्चिम- सीमा हिरे
नालासोपारा- राजन नाईक
भिवंडी पश्चिम- महेश चौघुले
मुरबाड- किसन कथोरे
कल्याण पूर्व- सुलभा गायकवाड
डोंबिवली- रविंद्र चव्हाण
ठाणे- संजय केळकर
ऐरोली- गणेश नाईक
बेलापूर- मंदा म्हात्रे
दहिसर – मनिषा चौधरी
मुलुंड- मिहीर कोटेचा
कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर
चारकोप – योगेश सागर
मालाड पश्चिम- विनोद शेलार
गोरेगाव- विद्या ठाकूर
अंधेरी पश्चिम- अमित साटम
विलेपार्ले- पराग अळवणी
घाटकोपर पश्चिम- राम कदम
वांद्रे पश्चिम- आशिष शेलार
सायन कोळीवाडा- कॅप्टन आर तमील सेल्वन
वडाळा- कालीदास कोळंबकर
मलबार हिल – मंगलप्रभात लोढा
कुलाबा- राहुल नार्वेकर
पनवेल- प्रशांत ठाकूर
उरण – महेश बालदी
दौंड – राहुल कुल
चिंचवड – शंकर जगताप
भोसरी – महेश लांडगे
शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
कोथरुड – चंद्रकांत पाटील
पर्वती- माधुरी मिसाळ
शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील
शेवगाव- मोनिका राजळे
राहुरी- शिवाजीराव कर्डिले
श्रीगोंदा- प्रतिक्षा पाचपुते
कर्जत जामखेड- राम शिंदे
केज- नमिता मुदंडा
निलंगा- संभाजी निलंगेकर
औसा- अभिमन्यू पवार
तुळजापूर- राण जगजितसिंह पाटील
सोलापूर शहर उत्तर- विजयकुमार देशमुख
अक्कलकोट- सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख
माण- जयकुमार गोरे
कराड दक्षिण- अतुल भोसले
सातारा- शिवेंद्रराजे भोसले
कणकवली- नितेश राणे
कोल्हापूर दक्षिण- अमल महाडिक
इचलकरंजी- राहुल आवाडे
मीरज- सुरेश खाडे
सांगली- सुधीर गाडगीळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!