शहापूर तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विविध विकासकामांचे आश्वासन ,तालुक्यातील पत्रकारांसोबत च्या स्नेह संमेलन चर्चा सत्रा मध्ये आमदार दौलत दरोडा यांची ग्वाही..
शहापूर : प्रफुल्ल शेवाळे
दिवाळी आणि निवडणुकीचे औचित्य साधत शहापूर चे आमदार दौलत दरोडा यांचे तालुक्यातील पत्रकारांसोबत स्नेह संमेलन आणि चर्चा सत्र
तालुक्यातील विविध प्रश्नांवर सडेतोड उत्तरे आणि आगामी काळात तालुक्याचा चेहरा मोहरा बदलणार – दौलत दरोडा
महाराष्ट्र राज्य विधानसभा 2024 च्या अनुषंगाने आणि दिवाळी सणाचे औचित्य साधत शहापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांनी सापगाव शहापूर येथे तालुक्यातील पत्रकारांसोबत स्नेह संमेलना चे आयोजन केले होते. पत्रकारांच्या चर्चा सत्राला,विविध प्रश्नांना सामोरे जात तालुक्याचा चेहरा मोहरा आणखीन विकास कामांच्या छायेत ठेवणार असल्याचे आश्वासन यावेळी आ. दरोडा यांनी दिले आहे.
१९९५ पासून आपण शहापूर च्या सक्रिय राजकारणात सहभागी असून विकासा ची नवीन दिशा घेऊन आम्ही आगामी निवडणुकीला सामोरे जात आहोत.महायुती सरकार ने ज्या काही विविध योजना राबवल्या आहेत त्या तळागाळातील, खेडोपाडी गोरगरीब लोकांपर्यंत पोहचविण्याचं मुख्य काम आम्ही करणार असल्याचे आ.दरोडा म्हणाले. शहापूर मधील विविध विकास कामांचे मुद्दे आम्ही लावून धरले, यात तालुक्यातील क्रीडा संकुलाचा मुद्दा हा निम्म्या प्रमाणात सुटला आहे.. आगामी काळात नक्कीच पूर्ण केला जाईल. शहापूर बस स्थानकच्या धिम्या कारभाराला गती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आहे.
भावली धरण पाणी प्रश्न बाबत अधिक न बोलता सदर धरणाचे पाणी हे तालुक्यातील जनतेला मिळो असं आ दरोडा यांनी म्हटलं आहे.
तालुक्यातील बेरोजगारांकरिता राज्याच्या कोशल्य विकास योजनेमधून एका सुसज्ज असं रोजगार निर्मिती केंद्र व्हावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या माहुली किल्ल्यासाठी एक पर्यटन स्थळ अथवा तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला यावं यासाठी आणि किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वे ची सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. जेणे करून मुंबई आणि राज्यातील इतर पर्यटक प्रेमी इथे मोठया संख्येने येतील असं आमचं दृष्टीकोण असणार आहे.
तालुक्यातील इकोसेन्सिटिव्ह झोन कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मदतीने केंद्र सरकार कडे पाठपुरावा करणार असल्याचे आ. दरोडा यांनी सांगितले आहे.
शहापूर तालुक्यातील वारकरी भवन विषय मार्गी लावण्यासाठी जागेची गरज आहे.. यासाठी कुणी दानशूर व्यक्ती पुढे आल्यास वारकरी भवन बांधून देण्याची जबाबदारी आपण पूर्ण करू.
तालुक्यातील पाणीटंचाच्या प्रश्नावर बोलताना दरोडा म्हणाले की भातसा धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्या मधून आपण दोन पाईप लाईन टाकून सदर प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे.. जेणेकरून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती साठी याचा फायदा होईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा निकाली लागण्यात मदत होईल.सदर पत्रकार परिषद मध्ये
आपल्याला मिळालेल्या उमेदवारी बद्दल आ. दरोडा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मनोमन आभार व्यक्त केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश चिटणीस डी. के. विशे सर, तालुका अध्यक्ष डॉ. मनोहर सासे आदींची उपस्थिती लाभली होती.